गो फर्स्ट
| ||||
स्थापना | २००५ | |||
---|---|---|---|---|
बंद | ३ मे, २०२३ | |||
हब |
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली) छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) | |||
मुख्य शहरे |
केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (बंगळूर) श्रीनगर विमानतळ (श्रीनगर) | |||
विमान संख्या | १९ | |||
मुख्यालय | वरळी, मुंबई | |||
प्रमुख व्यक्ती | जहांगिर वाडिया | |||
संकेतस्थळ | http://www.goair.in/ |
गो फर्स्ट, आधीचे गो एर, ही मुंबईमधील स्वस्त दरात विमानसेवा देणारी भारतीय कंपनी आहे.[१] नोव्हेंबर २००५ पासून सुरू झालेली ही कंपनी वाडिया समूहाच्या मालकीची आहे. मे २०१३ रोजी बाजारभावाप्रमाणे भारतातील पाचव्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी होती.[२] स्थानिक प्रवाश्यांससाठी २१ शहरांमधून रोजच्या रोज १०० उड्डाणे व आठवडयाला ७५० उड्डाणे केली जातात.[३] मुंबईमधील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ [४] आणि नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मध्यवर्ती ठाणे आहे.
गो फर्स्टने ३ मे, २०२३ रोजी उड्डाणे बंद करून दिवाळे जाहीर केले.
इतिहास
भारतीय उद्योजक नस्ली वाडीया यांचे थोरले सुपुत्र जहांगीर वाडिया यांनी [४] बॉम्बे डाईंग आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीजसारख्या सुप्रसिद्ध कंपन्या यशस्वीपणे चालविल्यानंतर नोव्हेंबर २००५ मध्ये गो एर या विमान कंपनीची स्थापना केली..[५] ते ह्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.[६] एर ए ३२० या विमानाच्या वापराने गो एरची सुरुवात झाली.[५] सुरुवातीच्या काळातच विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो, स्पाईसजेट यांसारख्या विमान कंपन्याकडून तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे गो एरचा बाजारपेठेतील वाटा खूप कमी होता.[७]
गो एरची प्रवासी विमानसेवा असलेली भारतातील राज्ये
भारतामधील २२ विमानतळांवरून गो एरची दैनंदिन १४०, व साप्ताहिक ९७५ उड्डाणे होतात.[३] भारतीय नागरी वाहतूक खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांच्या ताफयात फक्त १९ विमाने असल्यामुळे गो एरला आंतराराष्ट्रीय उड्डाणांची परवानगी नाही..[८]
शहर | IATA | ICAO | विमानतळ |
---|---|---|---|
अहमदाबाद | AMD | VAAH | सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ |
बंगळूर | BLR | VOBL | केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ |
भुवनेश्वर | BBI | VEBS | बिजु पटनायक विमानतळ |
चंदीगढ | IXC | VICG | चंदीगढ विमानतळ |
चेन्नई | MAA | VOMM | चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ |
दिल्ली | DEL | VIDP | इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ Hub |
गोवा | GOI | VOGO | दाबोळी विमानतळ |
गुवाहाटी | GAU | VEGT | लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ |
जयपूर | JAI | VIJP | जयपूर विमानतळ |
जम्मू | IXJ | VIJU | जम्मू विमानतळ |
कोची | COK | VOCI | कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ |
कोलकाता | CCU | VECC | नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ |
लेह | IXL | VILH | लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ |
लखनौ | LKO | VILK | चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ |
मुंबई | BOM | VABB | छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ Hub |
नागपूर | NAG | VANP | डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ |
पाटणा | PAT | VEPT | लोकनायक जयप्रकाश विमानतळ |
पोर्ट ब्लेअर | IXZ | VOPB | वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ |
पुणे | PNQ | VAPO | पुणे विमानतळ |
रांची | IXR | VERC | बिर्सा मुंडा विमानतळ |
सिलिगुडी | IXB | VEBD | बागडोगरा विमानतळ |
श्रीनगर | SXR | VISR | श्रीनगर विमानतळ |
विमाने व उड्डाणे यांची आकडेवारी
विमान | सेवेमधील | मागणी | प्रवासी | तपशील |
---|---|---|---|---|
एरबस ए३२०-२०० | ७ | - | १८० | एक स्वतःच्या मालकीचे आणि १५ भाडेतत्तवावरील(VT-GOL,VT-GOM & VT-GON) |
एरबस ए३२०-निओ | ५२ | — | २०१५ पासून पुरवठा[९] | |
एकूण | ७ | ५२ |
ए३२० निओची मागणी
जून २०११ मध्ये गो एरने .३२४ अब्ज रुपये किंमतीच्या ७२ ए३२० निओ या सुधारित नवीन इंजिन असलेल्या एरबसची मागणी केलेली आहे.[१०] एरबसची ए320 ही सुधारित आवृत्ती असून १८० आसनी असलेल्या या विमानामध्ये बऱ्याच अधिक सुविधा आहेत. ही विमाने २०१५पासून पुढे दरवर्षी १२-१५ विमाने गो एरच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.[१०]
लिव्हरी
जेव्हा गो एरने विमान वाहतुकीस सुरुवात केली तेव्हा त्यांच्या ताफयातील प्रत्येक विमानाच्या आतील भाग निळया, गुलाबी, नारिंगी, सफेद, हिरवा अशा वेगवेगळया रंगामध्ये रंगवले जात होते.[१०] २०११ नंतर मात्र विमानातील आतील भाग एकाच म्हणजे करडया रंगामध्ये रंगविले जात आहेत. तपशील खालीलप्रमाणे आहे.
- विमानाच्या बाहेरचा तळाच्या भागाला, आणि पंखाकडील कडांना, आणि शेपटीला करडा रंग..
- गो एरची वेबसाईट डब्लयू डब्लयू डब्लयू. गोएर.इन हीदेखील विमानाच्या इंजिनावर पांढऱ्या पार्श्वभूमीवर आणि करडया रंगाने दर्शविली जात आहे.
- करडया रंगात रंगविलेल्या शेपटीवर मध्यभागी गोएरचा लोगेा काढलेला आहे.
विमानातील सेवक
जुलै २०१3 मध्ये गोएरने पुढील सात वर्षाच्या काळासाठी इंधन बचत होण्याच्या उददेशाने महिला सेवक घेण्याचे जाहीर केले आहे. परंतु १३० पुरुष सेवकांना बेकार न करण्याचे कबूल केले आहे.[११][१२]
अंतर्गत सेवा
गोएर मध्ये इकॉनॉमी वर्गाच्या प्रवाशांना फक्त बसण्याची व्यवस्था करण्यात येत असून जेवणासाठी सोय उपलब्ध नाही. पण प्रवाशांना स्वखर्चाने चहा काफी सारखी पेये, सॅण्डविच, पराठे, बिस्किटे, शेंगदाणे, शीतपेये, पिण्याचे पाणी आणि इतर पदार्थ विकत घेण्याची सोय आहे. मनोरंजनाच्या सुविधा मर्यादित असून विमानामध्ये दैनिक भास्कर ग्रुपकडून प्रकाशित होणारी मासिके प्रवाशांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात.
पुरस्कार
पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशन यांचेकडून उत्तम दर्जा आणि सुविधा दिल्याबददल उत्कृष्ट स्थानिक विमानसेवा देणारी कंपनी (२००८) हा सन्मान[१३] एरबसकडून उत्कृष्ट सेवा देणारी विमानवाहतूक कंपनी.[१४]
संदर्भ व नोंदी
- ^ ""गो एर : संपर्क साधा"" (इंग्लिश भाषेत). 2014-09-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-12-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""बाजारभाव"" (PDF) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ a b ""गो एर : स्थानके"" (इंग्लिश भाषेत). 2017-08-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-12-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ a b आंतरराष्ट्रीय फलाईट ""डिरेक्टरी : वर्ल्ड एरलाईन्स."" Check
|दुवा=
value (सहाय्य) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link) - ^ a b ""गोएर : आमच्याविषयी"" (इंग्लिश भाषेत). 2014-09-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-12-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""ग्राहकांच्या इच्छेपेक्षा गरज निर्माण होईपर्यंत लहानच रहा : जे वाडीया."" (इंग्लिश भाषेत). 2013-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-12-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "ओन बोर्ड गो एर एरलाइन्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""कमी किमतीमध्ये विक्री करणार नाही."" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "गो एर ने ७२ नवीन एरबसची मागणी केली."
- ^ a b c ""गो एरने 3२,०००/- कोटी रुपयांत ७२ एरबस विमानांची मागणी केली."" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ [१]
- ^ [२]
- ^ ""गोएरला पीएटीडब्ल्यूएचा उत्त्म दर्जा आणि सुविधा दिल्याबददल पुरस्कार."[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश भाषेत). URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""एरबसकडून गोअरचा उत्त्कृष्ट सेवा देणारी विमान कंपनी म्हणून गौरव."" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)