Jump to content

बेगमपेट विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
बेगमपेट विमानतळ
బేగంపేట విమానాశ్రయము
حیدرآباد ائیرپورٹ
हैदराबाद विमानतळ
आहसंवि: noneआप्रविको: VOHY
माहिती
विमानतळ प्रकार सेना/सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ हैदराबाद, भारत
समुद्रसपाटीपासून उंची १,७४२ फू / ५३१ मी
गुणक (भौगोलिक) 17°27′11″N 078°28′03″E / 17.45306°N 78.46750°E / 17.45306; 78.46750
संकेतस्थळ aai.aero/allAirports/...
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ १०,६०० ३,२३१ डांबरी
२३ मार्च २००८पासून बंद

बेगमपेट विमानतळ (आहसंवि: -आप्रविको: VOHY)आंध्र प्रदेशमधील हैदराबाद शहरातील विमानतळ होता.२३ मार्च २००८ला हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाल्यावर हा विमानतळ बंद करण्यात आला.या विमानतळाचा सध्या 'आंध्र प्रदेश एव्हीएशन अकादमी' ,'राजीव गांधी एव्हिएशन अकादमी तसेच भारतीय वायुदल बेगमपेट वायुसेना तळ याचा उपयोग करतात. बेगमपेट विमानतळावर पूर्वी दोन टर्मिनल होते.हैदराबाद साठी आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत उड्डाणेही या विमानतळाने हाताळलीत.हे भारतातील सहावे व्यस्त विमानतळ होते.एर सहाराची सुमारे १२६ उड्डाणे येथुनच होत असत.

बेगमपेट विमानतळावर नवीन टर्मिनलजवळ १३ विमानांच्या पार्किंगची सुविधा आहे.त्याशिवाय उत्तर दिशेस ५ विमाने रात्री पार्क करता येतात.ही सुविधा ए-३२० आणि बोइंग-७३७ सारख्या मोठ्या विमानास तसेच पुढील तीन वर्षांसाठी पुरेशी आहे. यास पर्याय म्हणुन मार्च २००८ मध्ये हैदराबाद विमानतळ सुरू केल्याने, हैदराबाद या शहरात मध्यावर असलेले हा विमानतळ सध्या हवाईदलाच्या प्रशिक्षणासाठी तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंची ने-आण करण्यासाठी वापरला जातो.वाम राजकारणी पार्टीच्या सदस्यांनी नागरी हवाईवाहतूक मंत्रालयास तीव्र निवेदने लिहुन,हा विमानतळ कमी खर्चाच्या नागरी वाहतूकीसाठी, जे या कामासाठी उपयुक्त आहे,वापर पूर्ववत सुरू करण्यास दबाव आणत आहे.त्या मंत्रालयाने हवाई वाहतूक नियंत्रणाच्या प्रशिक्षणासाठी हा विमानतळ वापरण्याबाबत प्रस्ताव ठेवला आहे. पूर्वी या विमानतळावर मर्यादित स्वरूपात रात्री विमान उतरविण्याची सुविधा होती.थेट विमानसेवा नसल्यामुळे, आंध्र प्रदेशातील फक्त ४०% आंतरराष्ट्रीय उड्डाणेच येथुन जात होती..[] २००६ च्या सुरुवातीस अध्यक्ष जॉर्ज बुश यांचे 'एर फोर्स वन' हे विमान त्यांचे हैदराबाद भेटीदरम्यान येथे उतरले होते व उड्डाण भरते झाले.आंतर्‍आष्ट्रीय व देशांतर्गत वाहतूकीसाठी बेगमपेट विमानतळाची क्षमता प्रवाश्यांची वाहतूक वाढल्यामुळे,दरसाली ४५% या दराने वाढल्याचा रिपोर्ट आहे.ही भारतात सर्वाधिक आहे.या विमानतळाने सुमारे २०,००० प्रवासी दर दिवस या दराने तसेच, ३०० विमान चलन, ज्यात १६ आंतरराष्ट्रीय व १० देशांतर्गत उड्डाणांचा समावेश आहे, हाताळली आहेत.या विमानतळाच्या क्षमतेचे दातृत्व सुरुवातीस अपेक्षेपेक्षा बरेच कमी होते, पण मागणीनुसार त्यात वाढ झाली.ही सर्व वाढ बघुन,प्रश्न उभा राहतो कि भारतीय हवाईदल या तळाचा प्रत्यक्ष वापर कितपत करीत आहे व ते भविष्यात खुले कां करण्यात येउ नये. नवीन ८ विमानतळ सुरू करण्याबाबत व ते हैदराबादला व इतर विमानतळांशी जोडण्याबाबत,राज्य सरकारला खूप आशा आहे.या विमानतळावरून शेवटचे उड्डाण हे २२ मार्च २००८ रोजी थाई एरवेजचे बँकॉकला जाणारे आंतरराष्ट्रीय उड्डाण होते.

इतिहास

विमानतळ सुरू असतांना तेथे आलेले एक विमान

बेगमपेट विमानतळ हे सन १९३० मध्ये हैदराबाद एरो क्लबच्या उद्घाटनाने सुरू झाले.हैदराबाद राज्याचा निझाम यास त्याच्या डेक्कन एरवेझसाठी वापरत असे.ब्रिटिश भारतातील ही एक प्राथमिक विमानसेवा होती.सन १९३७ मध्ये टर्मिनल इमारत तयार झाली.[] दक्षिण दिशेस नंतर एक नवीन इमारत तयार केल्या गेली. नंतर हीच मुख्य इमारत झाली.जुन्या इमारतीस मग 'जुने बेगमपेट विमानतळ' असे संबोधिल्या जाउ लागले.सन २००८ मध्ये झालेल्या भारतातील प्रथम 'हवाई कसरती' १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान येथे झाल्या.

सर्वसाधारण विमानन(एव्हीऐशन) व प्रशिक्षण

येथील वाणिज्यिक सेवा बंद झाल्यावर,ते वायुदल व उड्डाण प्रशिक्षणासाठी वापरल्या जाउ लागले.प्रशिक्षणार्थी विमान हे फक्त याच्या दक्षिण दिशेचाच वापर करतात कारण उत्त्रेला असलेला भाग हा वाणिज्यिक सेवांसाठी बंद आहे.

संदर्भ

  1. ^ Airports in Andhra PradeshPDF (4.53 KiBapplication/pdf, 4647 bytes )
  2. ^ Begumpet Airport History[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती

बाह्य दुवे