तप्तदीपन कालमापन पद्धती
Appearance
तप्तदीपन कालमापन पद्धती (इंग्लिश: Thermoluminescence dating, थर्मोल्युमिनेसिन्स डेटिंग )
तप्तदीपन म्हणजे एखादी वस्तू तापविल्यावर तिच्यातील संग्रहित शक्तीचा प्रकाशात होणारा मुक्त अविष्कार. ही कालमापनाची पद्धत १९५३ साली प्रा. फॅरिंग्टन यांनी सुचविली. शास्त्रज्ञांच्या मते ही पद्धत जवळजवळ अचूक असून तिच्या कालमापनात फारतर १० टक्के चूक होऊ शकते. प्रत्येक मृद भांड्यात अत्यंत कमी प्रमाणात किरणोत्सारी द्रव्ये, युरेनियम, थोरेनियम, पोटॅशियम असतात. या घटकांचे विभाजन होताना त्यातून आल्फा, बिटा, गॅमा किरण एका विशिष्ट प्रमाणात उत्सर्जित होतात. यामुळे या द्रव्याचे विघटन होऊन मृद भांड्याच्या रचनेत फरक पडतो.