डिसेंबर २६
Appearance
<< | डिसेंबर २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६० वा किंवा लीप वर्षात ३६१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- १८९८ - मेरी क्यूरी आणि पिएर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
- १९७६ - कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (एकीकृत मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
- १९८२ - टाइम मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
- १९९७ - विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार देण्यात आला.
एकविसावे शतक
[संपादन]- २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.
जन्म
[संपादन]- १८९९ - उधम सिंग, भारतीय क्रांतिकारी
- १९१४ -.मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक
- १९१४ - डॉ. सुशीला नायर, स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या.
- १९१७ - प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक.
- १९२५ - पं. कृष्णा गुंडोपंत तथा के.जी. गिंडे, भारतीय शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक
- १९३४ - द.दि. पुंडे, मराठी समीक्षक.
- १९३५ - डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी).
- १९४१ - लालन सारंग, मराठी अभिनेत्री.
- १९४८ - डॉ. प्रकाश आमटे, मराठी समाजसेवक
मृत्यू
[संपादन]- १९७२ - हॅरी ट्रुमन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष.
- १९८९ - केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक
- १९९९ - शंकर दयाळ शर्मा, भारताचे राष्ट्रपती.भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती
- २००० - प्रा. शंकर गोविंद साठे, मराठी साहित्यिक.
- २००६ - कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर, मराठी अभिनेते
- २०११ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री.
- २०२४ - डॉ.मनमोहन सिंग, हे २० मे २००४ पासून २६ मे २०१४ पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. हे १४वे पंतप्रधान होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत होते. यापूर्वी ते इ.स.१९९१ साली पी.व्ही.नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- ग्राहक दिन
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - डिसेंबर २६ - डिसेंबर २७ - डिसेंबर २८ - डिसेंबर महिना