मार्च १५
Appearance
<< | मार्च २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७४ वा किंवा लीप वर्षात ७५ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]इ.स.पू. पहिले शतक
[संपादन]- ४४ - रोमन सेनेटमध्ये मार्कस जुनियस ब्रुटस डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी जुलियस सीझरची हत्या केली.
सोळावे शतक
[संपादन]- १५४५ - ट्रेंटच्या समितीची पहिली बैठक.
अठरावे शतक
[संपादन]- १७८१ - अमेरिकन क्रांती - उत्तर कॅरोलिना राज्यातील सध्याच्या ग्रीनबोरो शहराजवळ चार्ल्स कॉर्नवॉलिसच्या १,९०० ब्रिटिश सैनिकांनी ४,४०० अमेरिकन सैनिकांना हरवले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८२० - मेन अमेरिकेचे २३वे राज्य झाले.
- १८२७ - टोरोंटो विद्यापीठाची स्थापना.
- १८७७ - इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.
विसावे शतक
[संपादन]- १९०६ - रोल्स रॉइस कंपनीची स्थापना.
- १९१६ - अमेरिकेने मेक्सिकोच्या क्रांतिकारी पांचो व्हियाला पकडण्यासाठी आपले १२,००० सैनिक मेक्सिकोत घुसवले.
- १९१७ - रशियाच्या झार निकोलस दुसऱ्याने सिंहासन सोडले.
- १९२२ - फ्वाद पहिला इजिप्तच्या राजेपदी.
- १९२६ - थियोडोरोस पँगालोसची ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षपदी बिनविरोध निवड.
- १९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने उरलेले चेकोस्लोव्हेकिया गिळंकृत केले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध-खार्कोव्हची लढाई - खार्कोव्ह शहर परत जर्मनीच्या ताब्यात.
- १९४४ - दुसरे महायुद्ध-मॉँते कॅसिनोची लढाई - दोस्त राष्ट्रांनी मॉँते कॅसिनोच्या मठावर तुफान बॉम्बफेक केली व नंतर हल्ला चढवला.
- १९५२ - रियुनियन बेटावरील सिलाओस गावात आजच्या एका दिवसात १,८७० मिलिमीटर (७३ इंच) इतका उच्चांकी पाउस पडला.
- १९६१ - दक्षिण आफ्रिकाने ब्रिटिश राष्ट्रकुलातून अंग काढून घेतले.
- १९९० - मिखाईल गोर्बाचेव्ह सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९० - सोवियेत संघाने लिथुएनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
- १९९१ - सोवियेत संघ, मिखाईल गोर्बाचेव्ह व दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवरील आपला हक्क सोडला. जर्मनीला अधिकृतरीत्या स्वातंत्र्य.
एकविसावे शतक
[संपादन]- २००३ - हू चिंताओ चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २०१९ - न्यू झीलँडच्या क्राइस्टचर्च शहरात दहशतवादी हल्ल्यात ५० व्यक्ती ठार.
जन्म
[संपादन]- १६३८ - शुंझी, चीनी सम्राट.
- १७६७ - अँड्र्यू जॅक्सन, अमेरिकेचा ७वा राष्ट्राध्यक्ष.
- १७७९ - विल्यम लॅम्ब, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
मृत्यू
[संपादन]- इ.स.पू. ४४ - जुलियस सीझर, रोमन सम्राट.
- ४९३ - ओड्वासर, इटलीचा राजा.
- ११४५ - पोप लुशियस दुसरा.
- १९३७ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक.
- १९७५ - एरिस्टॉटल ओनासिस, ग्रीक उद्योगपती.
- १९९८ - डॉ. बेन्जामिन स्पॉक, अमेरिकन बालरोगतज्ञ.
- २००६ - जॉर्ज रॅलिस, ग्रीसचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- राष्ट्र दिन - हंगेरी.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मार्च १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च १३ - मार्च १४ - मार्च १५ - मार्च १६ - मार्च १७ - (मार्च महिना)